नवी दिल्ली- सध्या अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला (Alaya F) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसते. अनेक फोटो आणि व्हीडियो पोस्ट करत ती चाहत्यांशी जुळलेली असते. मात्र काही दिवसांपुर्वी ती बाळासाहेब ठाकरे यांचे नातू एश्वर्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली.
ही पार्टी दुबईत आयोजित केली होती. ही पार्टी ऐश्वर्य ठाकरे आणि त्यांच्या आई स्मिता ठाकरे यांनी आयोजित केली होती. या पार्टीचे फोटो त्या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पार्टीचा व्हीडियोसुद्धा प्रचंड वायरल झाला आहे.
या व्हीडियोमध्ये सगळे पार्टीत मजा करताना दिसत आहेत. हा व्हीडियो अलायाला टॅग करण्यात आला आहे. या आधी या दोघांना ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाच्या प्रीमियर शोला एकत्र बधितलं होतं. अलाया ने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून डेब्यू केलं होतं.