Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर लोकसभेला महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज रिंगणात उतरल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? याबाबत अजूनही संभ्रम आहे.
शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली जाणार की नाही किंवा भाजप हा मतदारसंघ ताब्यात घेऊन आपला उमेदवार देणार? याबाबत अजून चर्चा सुरूच आहे. | kolhapur loksabha election 2024
या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि काहीशी तशीच गत झालेल्या हातकणंगलेमधील खासदार धैर्यशील माने यांनी उमेदवारीवरून विश्वास व्यक्त केला आहे. दोघांनी सुद्धा उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. | kolhapur loksabha election 2024
दरम्यान, कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कमालीची रस्सीखेच सुरू आहे. कोल्हापूरची ठाकरेंची जागा काँग्रेसने आपल्या ताब्यात घेताना शाहू महाराजांना रिंगणात उतरवले आहे, तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी रिंगणात असले तरी त्यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला आहे. त्यांनी दोनवेळा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आपली साथ हवी, अशी साद घातली आहे. मात्र, अजूनही ठाकरे यांच्याकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. | kolhapur loksabha election 2024