मुंबई – अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ 9 डिसेंबर 2021 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आहे. राजस्थानमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने लग्न केलं. इतर सेलिब्रिटींप्रमाणे ‘बिग-फॅट वेडिंग’ न करता विकी आणि कतरिनाने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित साधेपणानं लग्न करणं पसंत केलं. सोशल मीडियावर या जोडीचे लाखो फॉलोवर्स असून, फॅन्स देखील या दोघांना भरभरून प्रेम देतात.
दरम्यान, बॉलिवूडचं हे कपल सध्या देवदर्शन करत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आईसह गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. सध्या या दोघांचे सिद्धिविनायक मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे वृंदावनला गेले होते. त्यांचे देखील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाले होते.
सध्या विकी-कतरिना कैफ यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. लग्नानंतर कतरिना ही पंजाबी सूनेचे सर्व कर्तव्य पार पाडताना दिसतेय, अशा शब्दांत चाहत्यांनी अभिनेत्रीच कौतुक केलं आहे. यावेळी विकी कौशलने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता, तर कतरिनाने हिरव्या रंगाचा सलवार-कुर्ता परिधान केला होता.