नवी दिल्ली – दिल्लीमध्ये शुक्रवारी (६ जानेवारी) महापौरपदाच्या निवडणुकीसाठी एमसीडीमध्ये मतदान होणार आहे. परंतु, मतदानापूर्वी सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. सभागृहात नगरसेवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सभागृहात प्रचंड गोंधळ सुरु असल्याचे पाहायला मिळते. यावेळी भाजप आणि आपचे नगरसेवकांमध्ये तुफान राडा सुरु असल्याचे दिसत आहे.
नगरसेवकांचा जोरदार गोंधळ सुरु असताना दिल्ली पोलीस देखील त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. दोन्हही बाजूचे नगरसेवक यावेळी जोरदार घोषणाबाजी करताना दिसून येतात. भाजप आणि आम आदमीचे नगरसेवक आपापसात भिडल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी ही बैठक पुढे ढकलल्याचा समजते.
#WATCH | Delhi: BJP and AAP councillors clash with each other and raise slogans against each other ahead of Delhi Mayor polls at Civic Centre. pic.twitter.com/ETtvXq1vwM
— ANI (@ANI) January 6, 2023
समोर आलेल्या माहितीनुसार, मनोज कुमार यांना पहिल्यांदा शपथ दिल्याने आपचे नगरसेवक नाराज झाले आणि त्यांनी सभागृहातच गोंधळ सुरु केला. त्यानंतर बाचाबाची सुरु झाली आणि भाजप नगरसेवक देखील भिडले. यावेळी महिला नगरसेवकांना धक्काबुक्की झाल्याचे देखील समोर आले. पोलिसांसह बीएसएफ जावं देखील हा राडा थांबवण्याचा प्रयत्न करत होते. दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच 250 निवडून आलेले नगरसेवक एकत्र मतदान करणार आहेत.त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या दिल्लीचे लक्ष लागून आहे.