नवी दिल्ली – थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी (13 जानेवारी) कमाल तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या दोन दशकांतील जानेवारी महिन्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. यावरून काश्मीर खोऱ्यातील हवामानामध्ये खूप बदल झालेले दिसून येत आहे.
जानेवारीमध्ये येथे बर्फवृष्टी कमी झाली आहे. काश्मीरच्या मैदानी भागात बर्फवृष्टीचा अभाव आणि दीर्घकाळ कोरडे हवामान यामुळे खोऱ्यातील तापमानात वाढ झाली आहे.
येथील अनेक स्थानकांवर तापमान 6-8 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान मोजल्या जात आहे. तर या तुलनेत दिल्लीचे तापमान घसरत खूपच कमी झाले आहे.