नवी दिल्ली – देशात करोना व्हायरसमुळे नागरिकांच्या हालचालीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ग्राहक हाताशी तयार खाद्यपदार्थ ठेवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे बिस्किटांच्या विक्रीत वाढ होत आहे.
भारतात ब्रिटानिया उद्योगाच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात 117 टक्क्यांची वाढ होऊन या कंपनीला 546 कोटी रुपयांचा नफा झाला.
ब्रिटानिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी सांगितले की, मार्चच्या सुरुवातीपासूनच बिस्किटांना मागणी होती. आताही त्यामध्ये घट झालेली नाही. पार्ले-जी उद्योगानेही आपल्या सर्व कारखान्यातून बिस्किटांची निर्मिती चालू ठेवली आहे. लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात येत नाही तोपर्यंत बिस्किटांच्या मागणीला वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.