मुंबई – रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताची चालू खात्यावरील तूट कमी होऊन राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.2 टक्के म्हणजे 10.5 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. (Current account deficit under control)
गेल्या वर्षी या तिमाहीतही तूट तब्बल 16.8 अब्ज डॉलर इतकी होती. तर दुसर्या तिमाहीतही तूट 11.4 अब्ज डॉलर होती. म्हणजे तिमाही पातळीवर आणि वार्षिक पातळीवर चालू खात्यावरील तूट कमी झाली आहे. एप्रील ते डिसेंबर या कालावधीत थेट परकीय गुंतवणूक 8.5 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. सेवा क्षेत्राच्या निर्यातीमधील महसूल 5.2 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे चालू खात्यावरील तूट कमी होण्यास मदत झाली असल्याचे दिसू येते.
भारत सरकारने रुपयाच्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी चालना दिली आहे. त्याचबरोबर परकीय चलनाचा कमीत कमी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताकडील परकीय चलन साठा वाढत आहे. त्याचबरोबर चालू खात्यावरील तूट कमी होण्यास मदत होत आहे.