सान्या मल्होत्रा “शकुंतला देवी’मध्ये शकुंतला देवीची मुलगी अनुपमा बनर्जीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाविषयी सान्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॉटफॉर्मवर झाला आहे. या चित्रपटात काम करण्याविषयीचा अनुभव सान्याने नुकताच सांगितला आहे.
सान्या म्हणाली, “शकुंतला देवी या चित्रपटात काम करण्याचा अनुभव खरंच फार निराळा आणि सुंदर होता. एका प्रतिभावंत व्यक्तीच्या जीवनावर आधारित काम करायला मिळणं हा नशिबाचा भाग आहे. खास करुन असा चित्रपट ज्यात आई-मुलीच्या नात्यावर प्रकाश टाकण्यात येतो”,
सान्या पुढे म्हणाली, “माझ्यासाठी हा काळ खूप रोमांचक आहे. आधी “शकुंतला देवी’चा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यानंतर नेटफ्लिक्सवर “लुडो’च्या रिलीजची घोषणा करण्यात आली आहे.’असं सान्या म्हणाली.