Stock Market Holiday । तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजेच शुक्रवार, 8 मार्च रोजी देशभरात महाशिवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. यानिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. यासोबतच आज शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही.
पुढील तीन दिवस शेअर बाजार राहणार बंद Stock Market Holiday ।
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या सुट्टीच्या यादीनुसार, भारतीय शेअर बाजार 8 मार्च 2024 रोजी बंद राहतील. अशा स्थितीत शुक्रवारी बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
यानंतर शनिवार आणि रविवारी आठवडी सुट्टी असल्याने बाजार बंद राहणार आहे. अशा स्थितीत शेअर बाजारातील व्यवहार पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. आता देशांतर्गत शेअर बाजार सोमवार 11 मार्च 2024 रोजी उघडेल. आज मल्टी कमोडिटी मार्केट देखील दोन्ही सत्रांसाठी बंद राहणार आहे.
2024 मध्ये इतके दिवस मार्केटला असणार सुट्टी Stock Market Holiday ।
2024 मध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या व्यतिरिक्त शेअर बाजार आणखी काही दिवस बंद राहणार आहे. या वर्षात एकूण 14 दिवस बंद राहणार आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे 52 आठवड्यात 104 दिवस बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. अशा परिस्थितीत शेअर बाजारातील व्यवहार वर्षातील 366 दिवसांपैकी 116 दिवस बंद राहतील.
हेही वाचा
gold silver price today। सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, १० ग्रॅमचा दर आता पोहोचला…
Automotive Industry : किरकोळ वाहन विक्रीत 13 टक्क्यांनी वाढ…