एमएलएमद्वारे फसवणुकीतील रक्कम वसुली लांबणीवर

साखळी पद्धतीने (एमएलएम) गुंतवणूकीतून आकर्षक व्याजाचे अमिष दाखवून सुमारे 18 लाख गुंतवणूकदारांचे आठ हजार कोटी बुडवणाऱ्या रॉयल ट्विंकल स्टार क्लब आणि सिट्रस चेक इन्स या कंपन्यांकडील वसुली लांबणीवर पडली आहे.

गुंतवणूकदारांच्या पैशाच्या वसुलीसाठी कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असून त्यासाठी नेमण्यात आलेल्या विक्री देखभाल कमिटीचे (एसएमसी) अध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) जे. पी. देवधर यांनी हा लिलाव एसएमसीऐवजी सेबीच्या देखरेखीखाली व्हावा अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाला केल्याने हे काम लांबणीवर पडले आहे. मे 2017 पासून कंपनीच्या सुमारे 100 मालमत्तांवर टाच आणण्यात आली असून त्यांचे मूल्य 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here