देना बँकेचे विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाल्यानंतर देना बँकेच्या मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुलातील मुख्यालयाची इमारत विक्रीस काढण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा ई-लिलावाद्वारे हा व्यवहार करणार आहे. या इमारतीच्या विक्रीतून किमान 530 कोटी रुपये मिळावेत अशी अपेक्षा आहे. 18 ऑक्टोबर रोजी या इमारतीचा लिलाव होणार आहे. एप्रिल 2019 मध्ये देना बँक आणि विजया बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनकरण झाले. त्यानंतर या बँकाच्या अचल संपत्तीची लिलावाद्वारे विक्री करण्याचे धोरण आखण्यात आले आहे.
देना बँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या भूखंडाचे क्षेत्रफळ 2878.36 चौरस मीटर असून त्यावर 9953.73 चौरस फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे.