‘या’ खलनायकाचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई – बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक स्टारकीड्सने आपल नशिब आजमावून पाहिल आहे. अनेक स्टारकीड्सची मुले-मुली बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आता या यादीत आणखी एका कलाकाराचा समावेश होणार आहे. बॉलीवूडमधील एकेकाळचा खलनायकन डॅनी डेंजोग्पा यांचा मुलगा रिंजिंग डेंजोग्पा हा आता जॉन अब्राहमसोबत झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

View this post on Instagram

 

Action #SquadGoals #InspireToBeBetter #Action #Team #JA #JohnAbraham #Nylo #GetItDone #LetsGo #Boom #Squad #Force

A post shared by Rinzing D (@rinzingd) on

अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी ‘स्क्वाड’ चित्रपटात तो झळकणार आहे. त्याने सोशल मीडियावर जॉनसोबतचा फोटो शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे. ‘स्क्वाड’ चित्रपटात रिंजिंगसोबत जॉन अब्राहम, मालविका, तनिषा ढिल्लन यांच्या मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग बेलारूसला होणार आहे. त्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम रवाना होणार आहे. त्यापूर्वी जॉनने रिंजिंगला फिटनेसचे धडेही दिले.

‘स्क्वाड’ हा एक अॅक्शनपट असणार आहे. रिंजिंगचा पहिलाच चित्रपट अॅक्शनपट असल्याने तो अॅक्शनहिरो म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता डॅनीनंतर त्याच्या मुलाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

Birthday Boy ? #Love #Dad #Smile #Happy #Always #Baapu #❤️

A post shared by Rinzing D (@rinzingd) on

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.