दिल्लीच्या निवडणूक मैदानात क्रीडापटूंची खेळी कायम

नवी दिल्ली – यावेळच्या लोकसभा निवडणुकीत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि चॅम्पियन बॉक्‍सर विजेंदर सिंग त्यांचे नशीब आजमावत आहेत. त्या दोघांमुळे दिल्लीच्या निवडणूक मैदानात क्रीडापटूंची खेळी कायम राहिली आहे.
गंभीरला भाजपने पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर विजेंदरला कॉंग्रेसने तिकीट दिले आहे. तो दक्षिण दिल्ली मतदारसंघातून निवडणुकीला सामोरा जाईल. याआधी किर्ती आझाद आणि चेतन चौहान हे माजी क्रिकेटपटूही दिल्लीतून निवडणूक मैदानात उतरले होते. आझाद यांनी 1993 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर लोकसभा निवडणुकांना सामोरे जात त्यांनी तीनवेळा खासदारकी भुषवली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपला रामराम ठोकत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते झारखंडच्या धनबादमधून कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. चौहान यांनी 2009 मध्ये पूर्व दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांची विकेट कॉंग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी त्यावेळी काढली. एकंदर, दिल्लीत क्रीडापटूंनी निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय खेळात उतरण्याचे सत्र कायम राहिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.