दिल्लीच्या निवडणुकीत प्रदुषणाचीच हवा

नवी दिल्ली : दिल्लीत पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीवर प्रदुषणाचा निर्णय परिणाम करणारा असेल, असे सर्वेक्षणात आढळून आले. 10 पैकी तब्बल 8 लोकांनी त्याबाजूने कौल दिला आहे.

मिलेनियल्स आणि जेनजी यांनी इंटरनेटद्वारे केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. दिल्लीतील प्रदुषणाला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे, असे मत 61 टक्के दिल्लीवासीयांनी व्यक्त केले आहे. सहापैकी एकाने या प्रश्‍नात केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. तर अनेकांनी ही राज्यसरकारची समस्या असल्याचे मत व्यक्त केले आहे. राजधानीतील प्रदुषणाने देशातील गुंतवणूक, पर्यटनावर परिणाम होत आहे. देशाच्या प्रतिमेवरही त्याचा परिणाम होत आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

प्रदुषणाची पातळी 528वर पोहोचली आहे. सकाळी 10 वाजता ती 583 या विक्रमी पातळीवर होती. दरम्यान प्रदुषणानंतर बेरोजगारी, शिक्षण आणि महिलांचे हक्क, सुरक्षा या गोष्टींना प्राधान्य दिले आहे. तरूण पिढीचा ओढा आम आदमी पक्षाकडे आहे. त्यांना दिल्लीकरांचे प्रश्‍न आम आदमी पक्ष सोडवू शकतो, असा विश्‍वास वाटतो, ज्येष्ठ नागरिकांना मात्र परवडणाऱ्या दरांत मुलभूत गरजा भागवल्या जाण्याला प्राधान्य दिले आहे. सुमारे 750 जणांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)