जेव्हा शरद पवार म्हणतात…. मी पुन्हा येईन ! मी पुन्हा येईन !

शरद पवार यांच्याकडून नितीन गडकरींच्या वक्‍तव्याचा समाचार

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातल्या सद्यस्थितीवरून राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं वक्‍तव्य केलं होतं. त्याचा वक्‍तव्याला आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मी क्रिकेट खेळत नाही, असं म्हणत गडकरींच्या वक्‍तव्याचा चांगलाच समाचार घेतला. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


राज्यातील एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. सध्या फॉर्म्युलावरही चर्चा सुरू असून ती प्राथमिक टप्प्यात आहे. ज्यावेळी त्यावर काही ठोस निर्णय होईल, त्यावेळी फॉर्म्युला सर्वासमोर उघड केला जाईल, असं पवार यावेळी म्हणाले. ज्याची मुख्यमंत्रिपदाची मागणी आहे, त्यावर विचार झाला पाहिजे. स्थिर सरकार यावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत. राज्यात स्थिर सरकारच स्थापन होईल, हे सराकर पाच वर्ष चालेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असंही त्यांनी नमूद केलं.

यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पुन्हा येणार असे म्हणत टोला लगावला. मी फडणवीसांना गेल्या काही वर्षांपासून ओळखतो. पण ते ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हे मला आत्ताच कळले, असे ते म्हणाले. राज्यातील जनतेने आज कोणालाही पूर्ण बहुमत दिले असते, तर आज चर्चा करण्याची वेळच आली नसती, असेही त्यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)