नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील विजयाबद्दल मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. त्यासाठी मोदी आणि राहुल यांनी ट्विटरचा आधार घेतला. मोदींनी दिल्लीतील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केजरीवाल यांना शुभेच्छाही दिल्या.
त्याला प्रतिसाद देत केजरीवाल यांनी ट्विटरवरून मोदींचे आभार मानले. देशाच्या राजधानीला खऱ्याअर्थी जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या बरोबरीने कार्य करण्यास उत्सुक असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही केजरीवाल आणि आपचे अभिनंदन केले. भाजप दिल्लीत विधायक विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.