नवी दिल्ली – नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये सोमवारी जोरदार धुमश्चक्री झाली. निदर्शकांनी दिल्ली परिवहन महामंडळाची बस पेटवून दिली, असे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र विद्यार्थी शांतपणे निदर्शने करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला, असा दावा विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला. या घटनेसंबंधी वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडिओत दिल्लीचे पोलीस सहआयुक्त विद्यार्थ्यांना अपील करताना दिसत आहे.
पोलीस सहआयुक्त म्हणाले कि…
दगडफेक न करण्याचे आवाहन मी तुम्हाला आवाहन करतो आहे. सातत्याने दगड आमच्या लोकांवर येत आहेत. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी आहे. तुमच्यामध्ये काही समाजकंटक तरुण आहेत. ते टयुबलाईट आणि गाड्या वगैरेची तोडफोड करत आहेत. तुम्ही निर्भय होऊ बाहेर यावे आणि आमच्याशी चर्चा करावी, अशी विनंती मी करतो. याठिकाणी अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तुमच्या सुरक्षेसाठी असून विद्यापीठाचे आणि परिसराचे नाव खराब होईल अशी कोणीतही अशी कृती ते करणार नाहीत. आम्ही तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. मी विद्यापीठ प्रशासनाला विनंती करतो कि बाहेर येऊन आमच्याशी चर्चा करावी, अशी अपील त्यांनी केली होती.
#WATCH Delhi Police Joint CP appeals to students of Jamia Millia Islamia to stay calm and stop stone pelting, on 15th December. (Source: Delhi Police) pic.twitter.com/vfYtzYVUYT
— ANI (@ANI) December 17, 2019
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आसाम, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही हे आंदोलन सुरू झाले आहे. दरम्यान मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लाभले. याविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.