नवी दिल्ली – दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्यासाठी तेथेही ऑपरेशन लोटस राबवले गेले पण ते फेल झाल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला असून या पक्षाच्या सरकारने उद्या विश्वासदर्शक ठरावाद्वारे आपल्या आमदारांची ताकद दाखवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
आज दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात भाषण करताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या विरोधकांची सरकारे पाडण्याच्या पद्धतीवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की दिल्लीतील 40 आमदार फोडण्यासाठी त्यांनी 800 कोटी रूपयांची तरतूद केली. लोकांवरील कर वाढवून ते आपल्या मित्रांना पैसे देतात आणि हेच पैसे विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी वापरले जातात.
भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक – शिवसेना
मोदींनी आत्तापर्यंत देशातील 277 आमदार खरेदी करण्यासाठी त्यावर साडे पाच हजार कोटी रूपयांचा खर्च केला आहे असा दावाही त्यांनी केला. आम्ही गुजरात मध्ये सत्तेवर आलो तर त्यांच्या 27 वर्षांच्या कारभाराची चौकशी करणार आहोत म्हणूनच त्यांनी येथे ऑपरेशन लोटस राबवले. पण आमचा एकही आमदार फुटु शकत नाही हे आम्ही उद्याच्या विश्वास दर्शक ठरावाच्यावेळी दाखवून देऊ असे ते म्हणाले.