नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ( PM Narendra Modi Popularity ) जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी हे 75 टक्के रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहेत. महासत्ता देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden ) यांचा या सर्वेतील यादीत टॉप 10मध्ये देखील समावेश नाही.
दिल्लीत भाजपचे “ऑपरेशन लोटस’ फेल! अरविंद केजरीवाल विश्वासदर्शक ठरावाद्वारे दाखवणार आमदारांची ताकद
लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदीं पाठोपाठ मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर ( Andres Manuel Lopez Obrador ) यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. ( PM Narendra Modi tops Popularity list ) त्यानंतर मजल मारत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत तिसरा क्रमांक नोंदवला आहे. या यादीत स्वित्झर्लंड, इटली, स्वीडन या देशांचा समावेश होतो.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरून गुलाम नबी आझाद पळाले”
मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स या संस्थेकडून हा जागतिक दर्जाचा सर्वे करण्यात आला आहे. ही रेटिंग 17 ते 23 ऑगस्ट 2022 पर्यंत गोळा केलेल्या डेटाच्या आधारे काढण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान मोदींची लोकप्रियता जागतिक पातळीवर कमालीची आहे.
भारताचे प्रतिस्पर्धी पाकिस्तान किंवा चीनसारख्या देशातील नेत्यांचा या यादीत समावेश देखील नाही. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन या यादीत अकराव्या, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन तेराव्या तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन विसाव्या क्रमांकावर आहेत.