केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे निवेदनाद्वारे मागणी
पुणे – शाळांकडून पालकांकडे शुल्कासाठी तगादा सुरू असून ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या शाळांच्या शुल्काचे धोरण निश्चित करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. ऑनलाइन शाळा सुरू करून शुल्क वसूल केले जात असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकतेच ऑनलाइन शाळांबाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यात शुल्काचा समावेश नाही. अनेक शाळा नियमित शाळांप्रमाणेच ऑनलाइन शाळांसाठीचे शुल्क घेत आहेत. ऑनलाइन शाळेसाठी वाचनालय शुल्क, संगणक कक्ष शुल्क, अन्य उपक्रमांचे शुल्क यांचा समावेश असू शकत नाही.
तरीही शाळांकडून हे शुल्क भरण्याची सक्ती पालकांवर होत आहे. त्यामुळे ऑनलाइन शाळांच्या शुल्काचे धोरण निश्चित करण्याची मागणी शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.