खटाव तहसील कार्यालय समस्यांच्या विळख्यात

महिला स्वच्छतागृह बंद; अस्ताव्यस्त कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर

आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल
तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अनेक लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यात यापूर्वी सुरू असलेले महिला वर्गाचे स्वच्छतागृह बंद केले आहे. तहसीलदारांनी याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला याबाबत कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलन करावे लागेल, असा इशारा सामजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे व नगरसेवक शाहजीराजे गोडसे यांनी दिला आहे.

वडूज – खटाव तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर कार्यालयातील महिला स्वच्छतागृह गेल्या अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. शिवाय आतील बाजूस अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आहे.

तहसील कार्यालयात शहरासह ग्रामीण भागातून वेगवेगळ्या कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. मात्र महसूलच्या चुकीच्या धोरणामुळे अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. जुन्या इमारतीत असलेले तहसील कार्यलय गेल्या काही महिन्यांपूर्वीच नवीन इमारतीत सुरू करण्यात आले. तर याठिकाणी लोकांसह कर्मचाऱ्यांना काही चांगल्या सुविधा मिळतील अशी आशा होती.

मात्र कार्यालयातील महिला स्वच्छतागृह बंद आहे, यामुळे महिलावर्गाची कुचंबना होत आहे. तसेच आतील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत कचरा साचून अस्वछता निर्माण झाली आहे. विशेषतः तहसील कार्यालयात प्रवेश करतानाच गुटखा, तंबाखू, पान खाऊन थुकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा फलक लावला आहे. मात्र कार्यलयात अनेक ठिकाणी गुटखा खाऊन फरश्‍या रंगवल्या आहेत. मात्र संबंधितांना याचे काही गांभीर्य राहिलेले नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)