मुंबई – ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळमात्रही संबंध नाही. परंतू सुषमा अंधारे यांनी याप्रकरणाशी माझा संबंध जोडला. मी त्यांना 24 तासांचा अल्टीमेटम दिला होता की, त्यांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य मागे घ्यावे परंतू त्यांनी तसे केले नाही. अल्टीमेटमची डेटडलाइन आज 12 वाजता संपल्याने मी त्यांना वकिलांच्या सल्ल्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
राज्यात सध्या ललित पाटलाचे ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. यामध्ये शिवसेनेच्या (ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांच्यावर आरोप केले होते.
याप्रकरणी शंभूराज देसाई यांनी अंधारेंना त्यांनी केलेले आरोप मागे घ्यावे असे वक्तव्य केले होते आणि मानहानीची नोटीस पाठविण्याचा अल्टीमेटम दिला होता. या प्रकरणात शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या कायदेशीर लढाईबाबत माहिती दिली.