Bollywood : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात हॉट आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जाते. सध्या हे कपल त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करत आहे. यासाठी ते बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सला येथे पोहचले आहे. येथील त्यांचे रोमॅंटिक फोटो दीपिका आणि रणविरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये पुलाच्यावर उभे असल्याचे दिसत आहे. जेथून पाणी वाहत आहे. यावेळी त्यांनी किस केल्याचा रोमॅंटिक अंदाजातील सुंदर फोटो शेअर केला आहे. यानंतर कमेंट सेक्शनमध्ये या जोडप्याच्या या फोटोवर चाहत्यांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह (ranveer singh) यांनी कॉफी विथ करण सीझन 8 मध्ये हजेरी लावली होती. पहिल्यांदाच त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला होता. या यावेळी, जोडप्याने त्यांच्या डेटिंग, लग्न, नातेसंबंध, वचनबद्धता आणि बरेच काही याबद्दल बोलले. त्यामुळे ‘कॉफी विथ करण सीझन 8’ चांगलाच चर्चेत आला आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचं लग्न 14 नोव्हेंबर 2018 मध्ये झाले आहे. बाजीराव मस्तानी, रामलीला गोलीयो की रासलीला, पद्मवात या सिनेमांमध्येही या दोघांनी एकत्र काम केलं आहे. दीपिका आणि रणवीर 83 या सिनेमातही एकत्र दिसले होते.