मुंबई- अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. व्यक्तिगत आयुष्यासह प्रोफेशनल लाईफबाबत अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करते. अनेकदा तिला फोटो आणि व्हिडिओवरून ट्रोल केले जाते. मात्र ती ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. आता पुन्हा एकदा चाहत्याने केलेल्या कमेंटवर मितालीने सडेतोड उत्तर दिले आहे.
यंदा दिवाळीनिमित्त मिताली मयेकरने नवीन कार खरेदी केली होती. मितालीने सोशल मीडियावर या गाडीचे काही फोटो शेअर केले. त्यात काहींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तर, काहींनी खोचक कमेंट केली. इनस्टाग्रामवर मितालीने गाडीचा फोटो शेअर करत ‘माझी लक्ष्मी’ असं कॅप्शन दिले होते. हे फोटो पाहून अनेकांनी त्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
View this post on Instagram
मात्र एका युजरने तिला ‘मर्सिडीज घ्यायची ना’, अशी खोचक कमेंट केली. या युजरला मितालीनेही उत्तर दिलं आहे. ‘माझं तेवढं बजेट नव्हतं. पण, पुढच्या वर्षी नक्की घेईन,’ असा रिप्लाय दिला. सध्या तिने दिलेल्या उत्तराचे चाहत्यांनकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच मिताली-सिद्धार्थने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं. त्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर नवी कार खरेदी केली. त्यामुळे सध्या ही जोडी चर्चेत आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विविध ठिकाणी ते फिरतही असतात. अनेकदा मिताली तिच्या बोल्ड अंदाजामुळे देखील चर्चेत असते. यावरून तिला ट्रोलही केले जाते.