नगर – नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रेमदान चौक येथील बिझनेस सेंटर या इमारतीमध्ये सुरु केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, संदेश कार्ले, शरद झोडगे, प्रा.शशिकांत गाडे, सोमनाथ धूत उपस्थित होते.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात संपर्क कार्यालय सुरु केले. कामाची मोठी जबाबदारी असली तरी जनतेशी नाळ कायम जोडली राहणार आहे. नागरिकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहेत असे ना. तनपुरे यावेळी म्हणाले.