जयंत पाटील यांच्या हस्ते फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण

शिराळा (प्रतिनिधी) : गतवर्षी सांगली जिल्ह्याने भीषण महापुराचा सामना केला. त्यातुन जिल्ह्यात अद्ययावत अशा यांत्रिक बोटींची गरज अधोरेखित झाली. भविष्यात महापूराची स्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यात बोटींची सुसज्जता असावी. यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून फायबर ग्लास यांत्रिक बोटी खरेदी करण्यात आल्या.

या बोटींचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी बोटींची पहाणी करताना बोटींची निर्मिती केल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार आणि पुरवठादार व्ही. डी. जामदार यांचे कौतुक केले.

कृष्णा घाट सांगली येथे जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदी काठावरील पूर बाधित गावांना फायबर ग्लास यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, महानगरपालिकेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.

जिल्हा परिषदेमार्फत पूर बाधित गावांना फायबर ग्लास यांत्रिक बोट पुरविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून २ कोटी १० लाख रूपयांची तरतुद करून एकूण १५ बोटी खरेदी करण्यात आल्या. या फायबर ग्लास यांत्रिक बोटी शिराळा तालुक्यातील सागावं, कोकरूड व आरळा, वाळवा तालुक्यातील भरतवाडी, वाळवा, शिरगांव व गौंडवाडी, मिरज तालुक्यातील हरीपूर, अंकली, मौजे डिग्रज व माळवाडी तसेच पलूस तालुक्यातील भिलवडी, आमणापूर, ब्रम्हनाळ, घनगावं-तावदरवाड या प्रत्येक गावांना १ या प्रमाणे देण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.