आमदार संग्राम जगताप; महात्मा फुले ब्रिगेडची कार्यकारिणी जाहीर
नगर (प्रतिनिधी) – महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार युवापिढीत रुजविण्याचे महत्वाचे कार्य महात्मा फुले ब्रिगेड करत आहे. सध्याच्या युवा पिढीला महात्मा फुले यांच्या विचार समजण्याची खरी गरज आहे. या महापुरुषांमुळेच महाराष्ट्राची प्रतिष्ठ वाढली, असे विचार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
नगर शहर फुले ब्रिगेडचे कार्यकारिणी जाहीर करुन त्यांचा सत्कार आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवकचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर, नितीन लिगडे, आशिष भगत, ब्रिजेश ताठे, क्रषिकेश ताठे, संकेत ताठे, हर्षल खेडकर, निखिल ताठे, संतोष मुंडे, मनोज नन्नावरे, निलेश खळदकर, मळू गाडळकर, गोंधळे आर्दीसह नूतन पदाधिकारी उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान सर्वच समाजासाठी खूप मोठे आहे. मुलींच्या शिक्षणाची चळवळ उभी करण्यासाठी महात्मा फुले यांच्यासमवेत सावित्रीबाई फुले यांचेही योगदान आहे. त्यांचे कार्य जगासमोर नेण्याची जबाबदारी आता तरुण पिढीची आहे. ते काम फुले ब्रिगेड करत आहे. फुले ब्रिगेडच्या या कामाचे अनुकरण इतर संघटनांनी घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असेही आमदार जगताप म्हणाले. अध्यक्ष दीपक खेडकर म्हणाले, “”आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात काम करत असताना फुले ब्रिगेडच्या माध्यमातून युवकांचे संघटन केले जाणार आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्याच्या प्रश्नासाठी काम करणार आहे.”
फुले ब्रिगेडची कार्यकारिणी अशी
शहराध्यक्ष : दीपक खेडकर, केडगाव विभागप्रमुख: महेश गाडे, भिंगार विभागप्रमुख : संतोष हजारे, सावेडी विभागप्रमुख : किरण जावळे, उपाध्यक्ष : स्वप्निल गायकवाड, महेश सुडके, गणेश जाधव, स्वप्निल पडोळे, आकाश डागवाले, संदीप शेलार, संकेत लोंढे, गणेश शेलार, सचिव : ओंकार गायकवाड, प्रशांत बनकर विक्रम बोरुडे, प्रसाद शिंदे, तेजस दळवी, सरचिटणीस :रमेश पुंड, सचिन बनकर, प्रसिद्धी प्रमुख : विश्वास शिंदे