गरीब, शेतकरी आणि सैनिकांसाठी समर्पित मोदी सरकार 2.0 – रामनाथ कोविंद  

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या संयुक्त सत्रात संबोधित करताना केंद्र सरकारचा अजेंडा सादर केला. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होईपर्यंत आम्ही विकासाच्या नवीन मानांकन साध्य करू. सरकारने जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताला समाविष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. यावेळी त्यांनी गरीब, शेतकरी आणि सैनिकांसाठी समर्पित मोदी सरकार 2.0 चा उल्लेख केला.

रामनाथ कोविंद म्हणाले कि, सरकारने कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता विकासकामे करत आहे. देशातील लोक मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत परंतु आता परिस्थिती बदलत आहे. 2014 पूर्वी देशामध्ये निराशाजनक वातावरण होते, परंतु आता सरकारने देशाच्या उभारणीसाठी पाऊल उचलले आहे. सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास या धोरणानुसार सरकार कामे करीत आहे.

30 मे रोजी शपथ घेतल्यानंतर लगेचच सरकारने नवीन भारताच्या निर्मितीसाठी निर्णय घेण्यास सुरुवात केली. यामुळे युवकांची स्वप्ने पूर्ण होतील, उद्योगामध्ये वाढ होईल. 21 दिवसांच्या कार्यकाळात सरकारने शेतकरी, सैनिकांसाठी आणि तरुणांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत.

सरकारने शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा विस्तार केला आहे. शेतकऱ्यांशी संबंधित पेंशन योजना देखील मंजूर केली आहे. पहिल्यांदाच सरकारने लहान दुकानदारांच्या आर्थिक सुरक्षेची नोंद घेतली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पेंशन योजना मंजूर केल्या आहेत. देशातील 30 दशलक्ष लहान दुकानदारांना याचा फायदा होईल.

पाणी संकट अनेक समस्यांपैकी एक आहे. पाण्याचे स्त्रोत कमी झाल्यामुळे पाणी संकट वाढले आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे येत्या काळात या संकटात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी, जलशक्ती मंत्रालय स्थापन करणे एक दूरगामी पाऊल आहे. याअंतर्गत पाण्याच्या संवर्धनाचे प्रभावी उपाय राबविण्यात येतील.

कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी 25 लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल. 2022 पर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट होण्यासाठी गेल्या पाच वर्षांत अनेक पावले उचलली गेली. सिंचन प्रकल्प, मृदा हेल्थ कार्ड, यूरिया नीम कोटिंग आणि एमएसपी सारख्या अनेक महत्वाच्या निर्णय घेण्यात आले आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आपली ताकदीची क्षमता प्रदर्शित केली आहे. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकार अखंडतेने काम करीत आहे. दहशतवादी मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करणे मोठे यश आहे, असेही राष्ट्रपतींनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.