नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारतर्फे काल लॉक डाऊनची मुदत २ आठवडयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच लॉक डाऊनच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आल्याने नागरी हवाई वाहतूक देखील पुढील दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे.
याबाबतचा निर्णय नागरी उड्डाण महासंचालनालयातर्फे जाहीर करण्यात आला असून येत्या १७ मेपर्यंत देशांतर्गत व परदेशी नागरी विमान वाहतूक पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे.
Directorate General of Civil Aviation (DGCA) issues circular to extend the prohibition of domestic & international commercial flight operations till May 17. pic.twitter.com/HzoYpU2kY7
— ANI (@ANI) May 2, 2020