मुंबई – मनमोहक सौंदर्य असणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘ऐश्वर्या राय बच्चन’ हिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ऐश्वर्या जितकी गुणी अभिनेत्री आहे, तितकीच ती बेधडक आणि स्पष्टवक्तीही आहे. असं या व्हिडीओ मधून दिसत येत आहे.
हा व्हिडीओ एका इंटरनॅशलन चॅट शोमधील आहे. यामध्ये डेविट लेटरमॅन शोचं सूत्रसंचालन करताना दिसत असून बोलण्याच्या ओघात त्याने भारतीय संस्कृतीची खिल्ली उडविली. मात्र ऐश्वर्यानेदेखील त्याची चांगलीच कानउडणी केली आहे.
‘अजूनसुद्धा तू तुझ्या आई-वडिलांसोबत राहते हे खरं आहे का?’, असा प्रश्न डेविटने ऐश्वर्याला विचारला. या प्रश्नावर ऐश्वर्याने ‘हो’ असं उत्तर दिलं. ऐश्वर्याचं उत्तर ऐकल्यानंतर त्याने पुन्हा एकदा ‘आजही भारतात इतकं मोठं झाल्यानंतर आई-वडिलांसोबत सर्रास राहिलं जातं का?’ असा दुसरा प्रश्न विचारला. त्याचा हा प्रश्न ऐकल्यानंतर उपस्थित सारेच हसायला लागले. मात्र डेविटचा हा प्रश्न ऐकल्यानंतर ऐश्वर्या थोडी नाराज झाली आणि तिने सडेतोड उत्तर दिलं.
View this post on Instagram
ऐश्वर्या म्हणाली, ‘हो भारतात आजही मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात. ही चांगली गोष्ट आहे. आणि काय आहे ना, आम्हाला आई-वडिलांसोबत जेवायचं असेल तर त्यासाठी अपॉइंमेंट घ्यावी लागत नाही’, असं उत्तर ऐश्वर्याने दिलं. तिचं उत्तर ऐकल्यानंतर डेविटने परत कोणताच प्रश्न तिला विचारला नाही. दरम्यान, ऐश्वर्यानं असं उत्तर दिल्यानंतर अभिषेक बच्चनही ट्विट करत तिचं कौतुक केलं होतं.
Yes! And it’s the proudest moment for me to be able to be there for them, as they have for me. Try it sometime, you might feel better about yourself.
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) April 17, 2018