नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या बाह्य जिल्हा पोलिसांना आज दोन पीसीआर कॉल आले. या कॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.
Delhi Police’s outer district police received two PCR calls today from a man who threatened to kill the Prime Minister, Union Home Minister and Bihar CM; a team deployed to locate the caller, say Delhi Police.
— ANI (@ANI) June 21, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, फोनवरून ही धमकी मिळाल्यानंतरच दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फोन करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक तैनात केले आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘त्या व्यक्तीला दारूचे व्यसन आहे आणि लवकरच त्याला पकडले जाईल. “आम्ही त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला. तो मद्यपी असून काल रात्रीपासून दारू पितो. सध्या तो घरी नाही. तो लवकरच पकडला जाईल.”
दरम्यान,अज्ञात फोनवरून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पोलिसांना धमकीचे फोन आले आहेत.