मुंबई – टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब आई-बाबा झाले आहेत. दीपिका व शोएबच्या घरी चिमकुल्या पाहुण्याचं आगमन झाले आहे. अभिनेत्रीने आज गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शोएबने इनस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ही माहिती दिली आहे. यानंतर आता त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दीपिकाने लग्नाच्या 5 वर्षानंतर सुंदर बाळाला जन्म दिला आहे. पण बाळाचा जन्म वेळे आधीच झाला असून काळजीचे कारण नसल्याची माहिती शोएबने दिली आहे. आधी दीपिकाचे एक मिसकॅरेज झालं होतं, त्यानंतर गर्भधारणा झाल्याने ती खूप आनंदी होती. अखेर दीपिका- शोएबच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाल्याने कुटूंबातील सदस्यही आनंदी आहेत.
दरम्यान, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. ‘ससुराल सिमर का’ या शोच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले होते. यानंतर त्यांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला, अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न रौनक सॅमसन या पायलटशी झाले होते. ती सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉस 12 ची विजेती आहे.