शेनझेन (चीन) – चीनमध्ये लाचखोरीच्या आरोपावरून कम्युनिस्ट पार्टीच्या एका माजी पदाधिकाऱ्याला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र या शिक्षेसाठी दोन वर्षांची सूट देखील देण्यात आली. गुआंगडोंग प्रांतातील शेन्झेन इंटरमीडिएट पीपल्स कोर्टाने 2 जून रोजी माजी वरिष्ठ अधिकाऱ्याला राजकीय अधिकारांपासून वंचित ठेवले आणि त्यांची सर्व वैयक्तिक मालमत्ता देखील जप्त केली.
गुन्ह्यांमधून त्यांनी मिळवलेले बेकायदेशीर नफा तसेच त्यातून मिळणारे फायदे जप्त करून ते राज्याच्या तिजोरीत जमा करावेत, असेही आदेश न्यायालयाने दिले. टोंग दाओची असे या चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या माजी पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
टोंग यांनी घेतलेल्या लाचेची रक्कम मोठी होती आणि त्यांच्या गुन्ह्याची परिस्थिती खूप भयंकर होती, त्यामुळे राज्य आणि लोकांचे मोठे नुकसान झाले. तथापि, तपासादरम्यान त्यांनी विश्वासूपणे त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली होती, केलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चात्तापही व्यक्त केला होता आणि त्यांचा सर्व बेकायदेशीर नफा परत करण्यात त्याने सहकार्य केले होते हे लक्षात घेऊन, त्याला देहदंडाची शिक्षा दोन वर्षांनंतर देण्यात येणार आहे, असे न्यायालयाने नमूद केले.