नवी दिल्ली- जागतिक संकेतानुसार भारतीय सराफात सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी काही प्रमाणात घट नोंदली गेली. दिल्लीस सराफात सोन्याचा दर 205 रुपयाने कमी होऊन 50,733 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
दिल्ली सराफात चांदीचा दर 964 रुपयाने कमी होऊन 61,555 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,844 डॉलर व चांदीचा दर 22.01 डॉलर प्रति औंस होता. याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपयाचे मूल्य कमी झाल्याचे दिसून येते.