बीजिंग – चीनमधील हुवेई प्रांतातील एका एक्सप्रेस वे वरील एका रॅम्प पूलाचा काही भाग कोसळल्यामुळे चौगांचा मृत्यू झाला आहे, तर इउतर 8 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
हुवेई प्रांतातील ओझोवू शहरात शनिवारी दुपारी हि दुर्घटना घडली. पूलाचा काही भाग कोसळल्यामुळे पूलावरून जात असलेले तीन ट्रक देखील खाली पडले. पूलाचा एक खांबदेखील कोसळला. त्या खांबाखाली एक कार चिरडली गेली.
या अपगातामुले या द्रुतगती मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक खंडीत झाली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा अपगात घडला तेंव्हा पूलावर काही कामगार काम करत होते. पूलावरून तब्बल 198 टन वजन वाहून नेणारे ट्रक गेल्यामुळे या रॅम्पचे दोन तुकडे झाले आणि तो कोसळला. त्यामुळे इतर दोन वहानेदेखील पूलावरून खाली कोसळली, असे प्राथमिक पहाणीमध्ये लक्षात आले आहे.
हुवेई प्रांतांचे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नरांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. अपघातानंतर लगेचच मदत कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. अपगातांच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जातो आहे.