बीजिग – वटवाघळांमध्ये नवीन करोना विषाणू सापडला असल्याचा दावा चिनी संशोधकांनी केला आहे. जगभर करोना विषाणूने थैमान घातलेले असताना नवीन करोना विषाणू सापडल्याच्या या दाव्यामुळे संशोधकांची चिंता आणखीनच वाढली आहे.
या वटवाघुळांमध्ये नव्याने सापडलेल्या विषाणूंमध्ये कोविड -19 विषाणूच्या अनुवांशिकदृष्ट्या सर्वात जवळचा दुसऱ्या क्रमांकाचा विषाणू देखील असू शकतो, असेही संशोधकांनी म्हटले आहे. नैऋत्येकडील वटवाघुळांमध्ये किची विषाणू आहेत आणि त्यापैकी कितीचा माणसांमध्ये प्रदुर्भाव होऊ शकतो यासंदर्भात हे संशोधन झाले होते.
वटवाघुळांमधील प्रजातींमधील सार्स कोव-2 सारख्या करोना विषाणूच्या एकूण 24 विषेणूंचे जीनोम एकत्र केले गेले. मे 2019 आणि नोव्हेंबर 2020 दरम्यान लहान वटवाघुळांच्या तोंडामधून हे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये सापडलेल्या विषाणूंमध्ये करोनाची साथ पसरवणाऱ्या विषाणूशी साधर्म्य असलेल्या विषाणूचाही समावेश आहे, असे सेल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात शेडोंग विद्यापीठाच्या चिनी संशोधकांनी सांगितले.
करोना निषाणूच्या उत्पत्तीबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून केले जात असलेले संशोधन प्रगतीपथावर आहे. याच दरम्यान नवीन विषाणू सापडला आहे.