जुन्नर -जुन्नर तालुक्यात बुधवारी (दि. 12) नऊ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 543 झाली आहे.
यामध्ये नारायणगाव 3, राळेगण 2 तर पिंपळगाव सिध्दनाथ 1, बेलसर 1, बेल्हे 1, पिंपळवंडी 1 असे एकूण 9 रुग्ण आढळून आले आहेत.
तर जुन्नर शहराजवळील पिंपळगाव सिद्धनाथ येथे एका पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.