नवी दिल्ली – प्राधान्यक्रमच्या सेवेसाठी अधिक रक्कम घेण्याचा प्लॅन व्होडाफोन मोबाइल सेवा देणाऱ्या कंपनीने जाहीर केला आहे. त्यामुळे ग्राहकावर अन्याय होईल अशी हरकत दूरसंचार नियामक अधिकारिणी (ट्राय) ने घेतली आहे. ट्रायच्या या हरकतीला उत्तर देताना व्होडाफोनने म्हटले आहे की नवा प्लॅन म्हणजे नवे सेवा नाही.
नवी दरआकारणी म्हणजे नवी सेवा नव्हे, असेही व्होडाफोनचे म्हणणे आहे. त्यामुळे इतर ग्राहकावर अन्याय होण्याचा प्रश्नच नाही. यासंदर्भात ग्राहकांनी कंपनीकडे कसलीही हरकत घेतली नसल्याच्या बाबीकडे व्होडाफोनने लक्ष वेधले आहे. नवीन योजना सुरू करणारे ग्राहक आमच्याकडे टिकून आहेत, असे व्होडाफोन कंपनीने म्हटले आहे.
अशीच भूमिका एअरटेल कंपनीने घेतली आहे. एका सेवेबरोबरच इतर सेवा देण्याचा प्रकार जिओ कंपनीने केला आहे. त्याचबरोबर अशा प्रकारची विशेष सेवा विमान वाहतूक कंपन्या, हॉटेल आणि इतर उद्योगात दिल्या जातात. आपल्या ग्राहकांना परवडतील अशा विविध सेवा देण्याचा अधिकार कंपन्याकडे असतो. मात्र, आम्ही अशी सेवा दिल्यानंतर त्याला हरकत घेण्यात आली आहे, असे एअरटेल कंपनीने म्हटले आहे. दोन्ही कंपन्याचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर ट्राय निकाल देणार आहे.