‘मिर्झापूर’मध्ये ललितचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू; बाथरूममध्ये सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मुंबई – ‘मिर्झापूर’ या अत्यंत नावाजलेल्या वेब सिरीजमध्ये ललित नावाचे पत्र साकारणाऱ्या ब्रम्हा मिश्रा यांचे निधन झाले आहे. या मालिकेत मुन्नाचे पात्र साकारलेल्या अभिनेता दिव्येंदु शर्मा याने याबाबतची माहिती इस्टाग्रामवरून दिली. ‘ललितचे पात्र साकारून सर्वांचे मन जिंकणाऱ्या ब्रम्हा मिश्रा यांच्या अकाली निधन सर्वांसाठीच वेदनादायी असून यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय’ अशी पोस्ट दिव्येंदु शर्माने केली आहे.   

प्राप्त माहितीनुसार ३६ वर्षीय ब्रम्हा मिश्रा यांचा मृतदेह त्यांच्या वर्सोवा येथील घराच्या बाथरूममध्ये आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला असून त्यांच्या घरातून घाणीचा वास येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती. याबाबत वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ब्रम्हा मिश्रा यांना बाथरूममध्ये असताना हर्ट अटॅक आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतचा सविस्तर रिपोर्ट अजून प्राप्त झालेला नाही.

ब्रम्हा मिश्रा हे गेल्या चार वर्षांपासून या घरामध्ये भाडेतत्वावर वास्तव्यास आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती देताना, मिश्रा वास्तव्यास असलेल्या सोसायटीतून त्यांना घाणीचं वास येत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचली तेव्हा फ्लॅट आतून बंद होता. पोलिसांनी डुप्लिकेट चवीने फ्लॅट खोलला असता ब्रम्हा मिश्रा यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये पडल्याचं आढळलं.

मिर्झापूर वेब सिरीजमध्ये ललितचे पात्र साकारल्यानंतर ब्रम्हा मिश्रा हे प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या या रोलबाबत त्यांची मोठी प्रशंसा देखील झाली होती. मिश्रा यांनी एका मुलाखतीत हा आपल्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट पात्र असल्याचं म्हंटल होत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.