“मिर्झापूर 2′ मधील पंकज त्रिपाठीचा दमदार लूक पाहिलात का?

 उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजमध्ये दाखविण्यात आले

मुंबई – ऍमेझॉन प्राईम वरील लोकप्रिय आणि बहुचर्चित ‘मिर्झापूर’ या वेबसीरीजचा लवकरच दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच ‘मिर्झापूर 2’चा ऑफिशल प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. मिर्झापूरचा नवीन टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ही सीरीज 23 ऑक्टोबर 2020 रोजी ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.

मिर्झापूर मध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी गँगस्टरच्या रुपात झळकला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची आता या नवीन सीजनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण या सीरीजच्या पहिल्या भागात कालीन भैय्याच्या व्यक्तिरेखेत पंकज त्रिपाठीने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती.

मिर्जापूरच्या पहिल्या भागात बबलू आणि गुड्डूची बायको स्विटीचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात गुड्डू आणि मुन्ना वाचले आहेत. आता गुड्डू, मुन्ना आणि कालिन या तिघांमधील युद्ध ‘मिर्झापूर 2’ सीझनमध्ये पहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

Kya soch rahe hai Tripathi ji? Aap logo ko pata ho toh zara comments mein bataye👇🏽

A post shared by Mirzapur Amazon (@yehhaimirzapur) on

उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.