मंचर -येथील तीन किराणा आणि एक ऍटोमोबाइल दुकानदारांवर दुकाने चालू ठेवल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी मंगळवार (दि. 7) गुन्हे दाखल केले. करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मंचर शहर प्रतिबंधित क्षेत्र प्रशासनाने जाहीर करूनही संबधितांनी दुकाने चालू ठेवल्याने कारवाई करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
मंचर (ता. आंबेगाव) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर येथील मुळेवाडी रस्त्यावरील पूजा किराणा ऍन्ड जनरल स्टोअर्स दुकानाचे मालक किशोर विठ्ठल बाणखेले (वय 48), विघ्नहर किराणा दुकानाचे मालक शांताराम सोपान बाणखेले (वय 65), ओम किराणा दुकानाचे मालक संतोष रामजी थोरात (वय 38) यांनी त्यांची किराणे दुकाने सुरू ठेवून प्रशासनाच्या आदेशाचा अवमान केला आहे.
याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे जवान जी. ए. डावखर यांनी फिर्याद दिली आहे, तसेच सागर उत्तम जाधव यांनी श्रीराम व्हील अलायमेंट आणि बॅलन्सिंग हे ऍटोमोबाइल दुकान सुरू ठेवून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे जवान विनोद गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
संबधित दुकानमालकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे आणि साथीचे रोग कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान जी. ए. डावखर करीत आहेत.