सेंच्युरियन – थ्री टीम क्रिकेट लढतीत एबी डीव्हिलियर्स ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता तसेच जितका तंदुरुस्त दिसला त्यावरून आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेत लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार कॉंन्टन डिकॉक याने व्यक्त केला आहे.
तीन संघांचा एकाच एकदिवसीय सामन्यात सहभाग असलेला थ्री टीम सामना नुकताच पार पडला. त्यात डीव्हिलियर्सने 26 चेंडूत 62 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यावरून त्याच्याकडे अद्याप 2 ते 3 वर्षांचे क्रिकेट शिल्लक असल्याची ग्वाही मिळते. त्याच्याशी झालेल्या संवादानंतर मला तो पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असल्याचे जाणवले, असेही डिकॉक म्हणाला.