इस्तांबुल: तुर्कीच्या जगप्रसिद्ध हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर झाल्यानंतर आज प्रथमच तिथे नमाज पठण करण्यात आले आहे.
ख्रिश्चिन बायझंटाईन साम्राज्यात हागिया सोफियाची निर्मिती झाली. 1453 साली ऑटोमनांच्या कॉंस्ट्यनटीनोपलच्या विजयानंतर या संग्रहालयाचे रुपांतर मशिदमध्ये करण्यात आले होते. मात्र, त्याला आतापर्यंत संग्रहालयाचाच दर्जा देण्यात आला.
मागील पंधरा दिवसांपूर्वीच तुर्कीच्या न्यायालयाने या संग्रहालयाचा संग्रहालय म्हणून असलेला दर्जा रद्द केला. त्यामुळे या संग्रहालयाचा मशिदीत रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप इरदोगोन यांनी हे संग्रहालय मुस्लिमांसाठी खुले केले आहे. या मशिदीत शुक्रवारी पहिल्यांदाच नमाज पठण करण्यात आले.