Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) विषप्रयोग केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. विषप्रयोगानंतर त्याची अवस्था अंत्यत गंभीर झाल्यामुळे त्याला पाकिस्तानमधील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने ह वृत्त दिले आहे. मात्र विषप्रयोग झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी याची अधिकृत पुष्टी अजूनही करण्यात आली नाही.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून दाऊद इब्राहिमवर संबंधित रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संबंधित मजल्यावर दाऊदवरच उपचार सुरु आहेत. फक्त उच्च वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाच त्याठिकाणी प्रवेश देण्यात येत आहे.
दरम्यान, दाऊदचं बॉलिवूडशी फार जुनं नातं आहे. एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये फक्त दाऊदचाच बोलबाला होता. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. फक्त बॉलिवूडच नव्हे तर क्रीडा विश्वातही त्याचं वर्चस्व पहायला मिळालं होतं.
‘अनिता अयुब’ (Anita Ayub) हे त्यापैकीच एक नाव आहे. या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. असं म्हटलं जातं की प्रसिद्ध चित्रपट निर्माते जावेद सिद्दिकी यांनी अनिताला त्यांच्या चित्रपटात घेण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर दाऊदने जावेद यांची हत्येची सुपारी दिली. अनिता आणि दाऊद यांचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर आहेत.
बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ‘मंदाकिनी’ (Mandakini). ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर तिने संपूर्ण बॉलिवूडवर आपली विशेष छाप सोडली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर दाऊदने मंदाकिनीशीच लग्न करायचं ठरवलं होतं. या दोघांच्या जवळीकची इतकी चर्चा होती की मंदाकिनीला चित्रपटांचे ऑफर्स मिळणंही बंद झालं होतं. दाऊदच्या भीतीपोटी कोणीच तिला काम द्यायला तयार नव्हतं.