Rohit Sharma : रोहित शर्मासाठी 2023 हे वर्ष एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. एक खेळाडू म्हणून तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण कर्णधार म्हणून हे वर्ष त्याच्यासाठी ‘अनलकी’ ठरले. भारतीय कर्णधाराला या वर्षात अनेकदा निराशेचा सामना करावा लागला. रोहित शर्मा केवळ टीम इंडियाच नाही तर आयपीएलचा कर्णधार म्हणूनही अयशस्वी दिसला. आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून हटवले. भारतीय कर्णधार म्हणून त्याने यावर्षी दोन आयसीसी ट्रॉफी फायनल गमावल्या.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव…
सर्वप्रथम, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात हरली. कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला.
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पराभव…
2023 मध्ये मायदेशात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने रोहित ब्रिगेडचा 6 गडी राखून पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने उपांत्य फेरीसह सलग 10 विश्वचषक सामने जिंकले होते पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजेतेपदाचा सामना गमावला.
INDW vs ENGW Test Day 3 : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, तिसऱ्याच दिवशी पॅकअप…
मुंबई इंडियन्सनेही कर्णधारपदावरून हटवले
रोहित शर्मा नुकताच दोन आयसीसी ट्रॉफी गमावल्याच्या दुःखातून सावरत असताना त्याच्या आयपीएल संघाने त्याला कर्णधारपदावरून दूर करून मोठा धक्का दिला. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे, परंतु तरीही मुंबईने त्यांच्या नियमित कर्णधाराला टाटा म्हणत हार्दिक पांड्याला नवीन कर्णधार म्हणून निवडले. हार्दिक पांड्या सुरुवातीला फक्त मुंबई इंडियन्सचा भाग बनला होता, पण काही दिवसातच मुंबई इंडियन्सने हार्दिकला कर्णधार बनवण्याची अधिकृत घोषणा केली.