जॅकी श्रॉफची मुलगी बास्केटबॉल प्लेअरच्या प्रेमात

बॉलीवूड ऍक्‍टर जॅकी श्रॉफची कन्या कृष्णा श्रॉफ सध्या आपल्या लवलाइफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीपासून कृष्णा श्रॉफ एका युवकाबरोबर डेटिंग करताना दिसते आहे. कधीकधी एअरपोर्टवर तर कधी रेस्टॉरंटच्या बाहेर हे दोघेही गप्पा मारताना दिसले आहेत. कृष्णा श्रॉफबरोबरचा हा युवक कृष्णाच्या सोशल मीडिया साईटवरही सारखा अपडेट देत असतो. हा मुलगा कृष्णा श्रॉफचा बॉयफ्रेंड असल्याची जोरदार चर्चा सुरू होती, पण कृष्णाने अद्याप त्यावर काहीही कॉमेंट केलेले नाही.

गॉसिप गॅंगने या युवकाचा बायोडेटा शोधून काढला आहे. याचे नाव इबन ह्याम्स असं असल्याचे समजले आहे. आपण कृष्णाचे बॉयफ्रेंड असल्याचे इबनने आपल्या सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर तशी पोस्ट टाकली आहे. कृष्णाचे काही बोल्ड फोटोही त्याने शेअर केले आहेत.

या रिलेशनशिपबाबत कृष्णाला कोणीतरी छेडले असता ती भडकली. “आपल्या स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. हा आमचा खासगी मामला आहे. आमची स्वतःची कंपनी, आमचं स्वतःचं आयुष्य, आमचे हेतू आणि आमचे सुख आमच्या स्वतःचा खासगी मामला आहे.’ असे तिने कॉमेंटमध्ये लिहिले आहे,

इबन हा एक बास्केटबॉल खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया नॅशनल बास्केटबॉल लीगमध्ये तो खेळतो. सध्या तो “युनायटेड बास्केटबॉल अलायन्स’मध्ये हरियाणा गोल्ड टीमकडून खेळतो आहे. त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया, इस्रायल आणि भारताचे नागरिकत्व आहे. स्वतःचा फिटनेस हे त्याचे असेट आहे. बाकी बॉलीवूड आणि तिथल्या सिनेमांमध्ये इबनला काहीही इंटरेस्ट नाही. त्याने तर जॅकी श्रॉफ यांचेही सिनेमे बघितलेले नाहीत. बाबा इबन, त्या टायगर श्रॉफपासून सावध राहा रे…!

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×