मुंबई: सध्या चांगल्याच चर्चेत असलेल्या कोहिनुर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणात ईडी ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावले आहे. कोहिनुर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणात सरदेसाई यांचा देखील समावेश असून त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती समोर येत आहे.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने सरदेसाई याना दोन दिवसापूर्वी चॊकशीसाठी हजार राहण्याची नोटीस पाठवली होती. त्यानंतर आज सरदेसाई हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजार झाले होते. कोहिनुर मिल प्रकरणी ईडी ने आत्तापर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी याचे चिरंजीव उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांना नोटीस पाठवल्या असून. त्यानंतर सुरुवातीला उन्मेष जोशी यांची नंतर राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, बांधकाम व्यावसायिक आणि भागीदार राजन शिरोडकर यांची आणि माणसे अध्यक्ष राज थॅकरे यांची तब्बन नऊ तास ईडीने चौकशी केली. तसेच उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची एकत्रित चौकशी करण्यात आली आहे. कंपनीला झालेला तोटा आणि केलेल्या गुंतवणुकी संदर्भात हि चौकशी करण्यात येत आहे.