मनीषाने चाहत खन्नाला मारल्या पाच थोबाडीत

एखाद्या सिनेमाचे शूटिंग सुरू असल्यावर अचानक काय घडेल सांगता येत नाही. अनेकवेळा अशा घटना घडतात, ज्या घडू नये अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण दिग्दर्शकाचे समाधान होत नसल्यामुळे “रिटेक’ करावा लागतो. त्यातून गमती-जमती तर होतातच. पण काही वेळेस अशा “रिटेक’मधून मनस्तापही होतो.

अशीच एक अनपेक्षित घटना मनिषा कोईराला आणि चाहत खन्ना यांच्या बाबतीत घडली. मनिषा कोईराला आणि चाहत खन्ना दोघीही संजय दत्तच्या “प्रस्थानम’ सिनेमांमध्ये एकत्र काम करत आहेत. या सिनेमाच्या सेटवर मनीषा कोईरालाने चाहत खन्नाला तब्बल पाच वेळा सणसणीत थोबाडीत दिल्या. खरंतर या सीनसाठी मनीषाने चाहत खन्नाला एकच सणसणीत थोबाडीत मारायची होती. मात्र प्रत्येक वेळी मनीषाचे टायमिंग चुकत होते. त्याबरोबर चाहत खन्नाची रिऍक्‍शनही चुकत होती. त्यामुळे या सीनचे “रिटेक’ घ्यावे लागले. बिचाऱ्या चाहत खन्नाला पाच वेळा थोबाडीत खावी लागली. चाहत खन्नावर कठोरपणे हात उचलणे मनीषाला कठीण जाऊ लागले. या सीनसाठी तिला आपली मानसिक तयारीही खूप करावी लागली. या सीननंतर चाहत खन्नाला भेटून मनीषाने आपली मानसिक अवस्था ठीक नसल्याचे सांगितले. अर्थात, चाहत खन्नाने हे सगळे खिलाडूवृत्तीने घेतले. त्यामुळे दोघींमध्ये तणाव निर्माण झाला नाही.

“प्रस्थानम’ हा सिनेमा संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त प्रोड्युस करत आहे. “प्रस्थानम’मध्ये संजय दत्त शिवाय जॅकी श्रॉफ, मनिषा कोईराला, अली फजल, चाहत खन्ना आणि चंकी पांडे आहेत. आणखी पंधरा दिवसांनी “प्रस्थानम’ रिलीज होईल. तेव्हा सीन बघायला मिळेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×