– नीलकंठ मोहिते
इंदापूर (प्रतिनिधी) : हा राज्याचा प्रकल्प नाही केंद्राचा आहे.येथील चौकात अपघात होत होते.म्हणून आंदोलने झाली.शेवटी नागरिकांच्या जीवाची काळजी करणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. परंतु येथील मालोजीराजांच्या स्मारकाच्या फरशा काढण्या अगोदर शिवभक्तांना विचारात घेऊन प्रशासनाला विचारात घेऊन काम सुरू करायला पाहिजे होते. झालेली गोष्ट चुकीची आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. अशी तंबी ठेकेदार अधिकाऱ्यांना माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
उपस्थित ठेकेदार यांना आमदार भरणे म्हणाले, उभारलेले स्मारक काही आपल्या बापाचे आहे का? कोणाची तुम्ही परवानगी घेतली असाही संतप्त सवाल आमदार दत्तात्रय भरणे यांनी ठेकेदारांना अधिकाऱ्यांना केला. ज्यांनी हे स्मारक उभारण्यात कुठे मदत केली नाही ते सुद्धा पुढे येऊन बोलत आहेत. छत्रपती मालोजीराजे आमचे अस्मिता आहे हे लक्षात ठेवा अशी ही तंबी आमदार भरणे यांनी दिली आहे.
माझ्या नावाचा कुणी बोर्ड पडला असेल त्याचे मला देणे घेणे नाही. स्मारकाच्या फरशा काढणे ही मोठी चूक या ठेकेदाराने केलेली आहे.खरे तर नॅशनल हवे कडून आपण ना हरकत घेऊन हेच स्मारक उभारले होते.तीन वर्षांपूर्वी हा आराखडा आम्ही केलेला होता.परस्पर स्मारकाला हात लावायला नाही पाहिजे होता. नॅशनल हायवे व कॉन्ट्रॅक्टरची ही चूक आहे.आमची असणारे अस्मिता पाडण्याचे धाडस का केले.याचा मी जाहीर पद्धतीने निषेध करतो.अशी माहिती पत्रकारांना आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
जो माणूस घर बांधतो तो घर कधी तोडत नसतो.मोकळात गप्पाठप्पा मारून शोभाज करायचा नसतो.हे स्मारक मी बांधायला लावले आहे.यासाठी मी कष्ट घेतले आहे. तुम्हाला वीस वर्षात का बांधायला जमले नाही.असा विरोधकांना सवाल आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नगरसेवक अमर गाडे, गजानन गवळी, श्रीधर बाब्रस, यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आजपर्यंत जे कुणी केले नाही ते आमदार भरणे यांनी केले”
इंदापूर बाह्य वळनशिल्प केवळ माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामुळे उभा राहिले.जे आजतागायत कुणी केले नाही ते आमदार दत्तात्रय भरणे यांचेमुळे झाले.हे जनतेच्या लक्षातून जाणार नाही अशी माहिती नगरसेवक अमर गाडे यांनी दिली.