India A vs England Lions (Tour Match) : अहमदाबाद येथे भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने संघाची घोषणा केली. हे दोन्ही सामने 24 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते चार दिवस चालणार आहेत. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतील.
रिंकू सिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, इंग्लंड लायन्स विरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी BCCI (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) ने रिंकूचा संघात समावेश केला आहे. याशिवाय 19 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज कुमार कुशाग्रा, जो 7.2 कोटी रुपयांना आयपीएल 2024 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला होता. त्याचाही प्रथमच अ संघात समावेश करण्यात आला आहे.
चौथ्या आणि शेवटच्या अनधिकृत कसोटीसाठी रिंकू सिंग सरफराज खानच्या जागी खेळणार आहे, तर अर्शदीप सिंगलाही संधी मिळाली आहे. हैदराबादसाठी रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तिलक वर्मा संघात परतला आहे.
दुसऱ्या बहु-दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, टिळक वर्मा, कुमार कुशाग्रा, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल.
तिसऱ्या बहु-दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, टिळक वर्मा, रिंकू सिंग, कुमार कुशाग्र, वॉशिंग्टन सुंदर, शम्स मुलानी, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल.
IND vs ENG Test Series 2024 : विराट कोहलीकडे अनेक विक्रम करण्याची संधी…
पहिला सामना अनिर्णित…
इंग्लंड लायन्स आणि भारत अ यांच्यातील पहिला दौरा (Tour Match) सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात प्रथम खेळताना इंग्लंड लायन्स संघाने 233 धावा केल्या, तर भारत अ संघाने 5.07 च्या धावगतीने 91 षटकात 462/8 (डाव घोषित) केला.
या सामन्यात रजत पाटीदारने 111 धावांची खेळी केली, तर सर्फराज खान (96), श्रीकर भरत (64), ध्रुव जुरेल (50) यांनी धावा केल्या. तर गोलंदाजीत मानव सुथारने सर्वाधिक ३ बळी घेतले.